प्रीती देवराम खुन प्रकरणातील 'यांचा' जामीन फेटाळला बार्शी सत्र न्यायालयाने फेटाळला



बार्शी |

बार्शी शहर पोलीस ठाण्यात दि. 03/03/2022 रोजी अमित नन्नवरे यांनी त्यांची बहीण सौ. प्रिती हीचा तिचा नवरा स्वप्निल देवराम, नणंद ज्योती गोरे, नणंदेचा नवरा महेश गोरे, सासु व इतरांनी हुंड्यासाठी तसेच प्रितीच्या चारित्र्यावर अकारण संशय घेऊन महेश गोरे याच्या अलिपुर रोड, बार्शी येथील घरी खुन केला आहे अशी फिर्याद दाखल केली आहे. 

पोलीसांनी दि. 07/03/2022 रोजी आरोपी महेश गोरे यास अटक केली. आरोपीने बार्शी येथील मे. सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. हा खुन नसुन आत्महत्या आहे, आरोपी हा घटना घडली तेव्हा घटनास्थळी उपस्थित नव्हता तर तो एका बँकेत गेलेला होता असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला. 

परंतु सदरची घटना ही आरोपीच्या घरात घडलेली आहे, खुनाच्या गुन्ह्यास आत्महत्या भासवण्याचा  प्रयत्न केला गेला, आरोपी घटनास्थळी होता की नाही हे खटला सुरू झाल्यानंतरच सिद्ध केले जाऊ शकते, एक आरोपी अद्याप फरार आहे असा युक्तिवाद मुळ फिर्यादीतर्फे अ‍ॅड. अतुल पाटील यांनी केला.  गुन्हा गंभीर स्वरुपाचा असुन आरोपीला जामीनावर सोडल्यास साक्षीदार व पुराव्याशी छेडछाड केली जाण्याची दाट शक्यता आहे, महेश गोरे याचेविरुद्ध फिर्यादीमध्ये स्पष्ट आरोप करण्यात आलेले आहेत या कारणास्तव मे. सत्र न्यायाधीश जगदाळे साहेब यांनी आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

फरार आरोपी ज्योती महेश गोरे हीला देखील पोलीसांनी लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी अ‍ॅड. अतुल पाटील यांनी पोलीसांकडे केली आहे.

Post a Comment

0 Comments