सिरसाव |
परंडा तालुक्यातील सिरसाव येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे दिव्यांग उद्योग समूहाच्या वती- ने बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये विविध प्रश्नावर चर्चा करण्यात आली या बैठकीस सरपंच कुमार वायकुळे, माजी सरपंच संजय पवार मुकुंद चोबे ग्रामपंचायत सदस्य या सर्वांच्या उपस्थितीमध्ये दिव्यांग उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष तानाजी घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांगांना ५% टक्के निधी संदर्भात बैठक पार पडली.
या बैठकीमध्ये दिव्यांगाच्या विविध समस्या व प्रश्नावर चर्चा
करण्यात आली व ग्रामपंचायत सरपंच यांनी समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे आश्वासन दिले यावेळी दिव्यांग उद्योग समूहाचे परंडा तालुका अध्यक्ष पांडुरंग मिसाळ, सचिव पांडुरंग चोबे, शहराध्यक्ष गोरख देशमाने, उत्तम मिसाळ, विजय मिसाळ , संतोष चोबे, सुरेखा उमरदंड, बिस्मिल्ला पठाण, भाऊसाहेब काकडे, मुकुंद चोबे, बालाजी मिसाळ, तुकाराम मिसाळ, हनुमंत दिवटे, नारायण दिवटे आधी दिव्यांग बांधव उपस्थित होते.
0 Comments