मुंबई |
अजितदादा पवार हे नेहमीच चर्चेतले व्यक्तिमत्त्व समजले जातात, ते पुन्हा एकदा नॉटचेबल झाल्यामुळे तर तर्क वितर्कला उधाण आले आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असल्याची चर्चा आहे. अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केल्यानंतर, संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला. मात्र, अजित पवारांनी कोणताही विरोध दर्शवला नाही किंवा साधे ट्विट सुद्धा केले नाही. त्याने ते नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. कारण, आपल्या बहिणीवर कोणी अशी टिप्पणी करते किंवा गैर वागते तेव्हा गप्प राहणाऱ्यातले अजित दादा नाहीत हे आपणही जाणतो.
अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये नाराज असल्याची उदाहरणे काही नवी नाहीत. 'पहाटेच्या शपथविधी' वेळी सुद्धा ते नॉट रिचेबल होते आणि ते नाराज असल्याची चर्चा होती. आता पुन्हा काही नवे वळण या प्रकरणाला मिळते का? अशी शंका व्यक्त केली जात आहे.
0 Comments