सोलापूर |
SORRY मला माफ करा मित्रांनो" असे व्हाट्स अप स्टेटस ठेवून नरेश चन्नप्पा विठ्ठेवोल्लू हा तरुण घरातून निघून गेला असल्याची फिर्याद सदर बाजार पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.29 सप्टेंबर रोजी नरेशचे राहत्या घरी कुटुंबातील इतर सदस्यांसोबत किरकोळ कारणावरून वाद झाले होते.या वादात नरेश विठ्ठेवोल्लू हा खूपच नाराज झाला आणि राहत्या घरातुन निघून गेला आहे.
नरेशच्या आई वडिलांनी 29 सप्टेंबर च्या रात्रीपासून त्याचा सर्वत्र शोध घेतला.पण तो काही सापडला नाही.मित्रमंडळी,नातेवाईकांकडे शोध घेतला पण अखेर बाबू रायप्पा विठ्ठेवोल्लू (रा स्लोटर हाऊस, लष्कर, सोलापूर) यांनी सदर बाजार पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली आहे.नरेश विठ्ठेवोल्लू याने व्हाट्सअप स्टेटस ठेवून मोबाईल देखील बंद केला आहे,यामुळे नरेशचे नातेवाईक व मित्रमंडळी चिंतेत पडले आहेत.त्याला मराठी,हिंदी व तेलगू भाषा येते असेही पोलीस फिर्यादीत नोंद केले आहे .याबाबत अधिक तपास सदर बाजार पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक जमादार करत आहेत.
0 Comments