बार्शी |
बार्शी तालुक्यातील एका गावांमधील भाऊजई सोबत दिरानेच गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे, पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार एक जणांवर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलाही आपल्या मुलासोबत शहरातील एका भागामध्ये राहत होती. त्यांच्याकडे पीडित महिलेचा चुलत दिर अधून मधून घरी येत होता, पीडित महिलेसोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला, व शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली व पीडित महिलेच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. पिडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार भादवि कलम 452, 354, 323, 504, 506 कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल एस.आर. घोडके हे करत आहेत.
0 Comments