सोलापूर | कोंडीजवळ उभ्या ट्रकला धडकून दुचाकीवरील तरुणाचा जागीच झाला मृत्यू


सोलापूर |

सोलापूर-पुणे महामार्गावरील कोंडी जवळ शनिवारी सायंकाळी कडेला थांबलेल्या मालट्रकला पाठीमागून धडकून दुचाकी एका तरुणाचा मृत्यू झाला आहे तर दुसरा जखमी झाला आहे. सोहेल सिराज बेगडे (वय वर्षै २२) असे मृत तरुणाचे नाव असून समाधान शिवाजी धनवडे (वय वर्षे २३,दोघेही रा.तामलवाडी ,ता. तुळजापूर) हा जखमी झाला आहे.

शनिवारी सायंकाळी सोहेल व समाधान हे आपल्या
मोटारसायकलवरून मोहोळकडून सोलापूरकडे निघाले असताना कोंड़ी जवळ थांबलेल्या मालट्रकला मागून धडकले.यामध्ये दोघे जखमी झाले.त्यांना सावळेश्वर टोल नाक्याच्या अँम्बुलन्स मधून छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.उपचारा दरम्यान सोहेल याचा मृत्यू झाला.या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे.

Post a Comment

0 Comments