उस्मानाबाद |
सन 2020 चा पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करा या व अन्य मागण्यासाठी शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे, या उपोषणात खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सहभाग घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्या तात्काळ मान्य करण्याची मागणी शिंदे - फडणवीस सरकारकडे केली.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष नंदुभैय्या राजेनिंबाकर, तालुका प्रमुख सतिशकुमार सोमाणी, माजी नगरसेवक राजाभाऊ पवार, तसेच अखिल भारतीय विरशैव शिवा संघटना जिल्हा धाराशिव, युवासेना, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती, तसेच ग्रामपंचायत कार्यालय, डकवाडी, मस्सा, खेड, देवळाली, मेडसिंगा, हासेगाव, वडगाव, बोरगाव, राजुरी, चिखली, दारफळ, शेजगाव (ज), दहिफळ, मोहा, देवळाली, पळसप, सांजा, शेळका धानोरा, बहुला, देवधानोरा आदी ग्रामपंचायतींनी पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे.
तसेच युवासेना जिल्हाप्रमुख तथा राज्य विस्तारक अक्षय ढोबळे, धाराशिव युवासेनेचे तालुकाप्रमुख वैभव वीर, आय.टी सेल जिल्हाप्रमुख रणजित महाडिक, तुळजापूर उपतालुकाप्रमख रोहित चव्हाण, माजी पंचायत समिती सदस्य संग्रामभैय्या देशमुख, गजेंद्र जाधव, नगरसेवक सोमनाथ अप्पा गुरव, माजी शहरप्रमुख प्रविण कोकाटे, भिमाआण्णा जाधव, अतिक सय्यद, बळीराम कांबळे, तसेच अनेक शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments