सोलापूर |
सोलापुरातील जेलरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकां विरोधात प्रहार संघटनेने वज्रमूठ करत संबंधित पोलीस निरीक्षक जाफर मोगल यांना तात्काळ निलंबित करा,अशी मागणी केली आहे.सोलापूर शहरातील मुस्लिम लोकसंख्या असलेल्या भागातील जेलरोड पोलीस ठाणे येथे जाफर मोगल हे वरीष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कामकाज पाहत आहेत.जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेगम पेठ,विजापूर वेस ,सिद्धेश्वर पेठ येथे मोठी बाजारपेठ आहे.रस्त्यावर अनेक छोटे व्यापारी हातगाड्यावर विविध वस्तू विकत असतात.शनिवारी एका रस्त्यावर बूट विक्री करणाऱ्या व्यक्तीस लात मारली आहे.याबाबतचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे.प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यानी व कार्यकर्त्यांनी याची दखल घेत,व्यवसाय करणाऱ्या गोरगरीब व्यापाऱ्यांना मारहाण करणाऱ्या पोलीस निरीक्षका कारवाई करावी,व गुन्हा दाखल करावा,अशी मागणी केली आहे.अन्यथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील घरासमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.
प्रहार संघटनेच्या पदाधिकऱ्याना देखील दमदाटी केली होती असा आरोप केला-
प्रहार जनहित शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन केले आहे.सोलापूर शहरातील समस्याबाबत आंदोलनाचा इशारा यापूर्वी दिला होता,महानगरपालिका आयुक्त पी शिवशंकर यांच्या कार्यालयात डुक्कर सोडणार असा इशारा दिला होता पण ऐनवेळी प्रहारच्या पदाधिकाऱ्याना पोलिसांनी वेळीच ताब्यात घेण्यात आले होते.शहर कार्याध्यक्ष खालिद मणियार यांना जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले होते.यावेळी पोलीस निरीक्षक जाफर मोगल यांनी खालिद मणियार यांना पोलीस ठाण्यात आणून दमदाटी केली,आणि अरेरावीची भाषा वापरत तडीपार करण्याचा दम दिला असा आरोप खालिद मणियार यांनी केला आहे.याविरोधात आम्ही मंत्र्यालयात जाऊन बचू कडू व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले आहे अशी माहिती शहर अध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी दिली.
बूट विक्रेत्यास मारहाण-
शनिवारी दुपारी पोलीस निरीक्षक जाफर मोगल कडून मारहाण झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.बेगम पेठ येथे शॉपर्स मार्केट आहे,त्याठिकाणी बूट विक्रेता मोहसीन नयूम सय्यद व त्यांचा भाऊ सेल बाबत घोषणा देत असताना जेलरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जाफर मोगल त्याठिकाणी आले ,आणि बूट विक्रेत्यास शिवीगाळ करून मारहाण करू लागले,याचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे.या मारहाणीत बूट विक्रेत्याच्या पायाला इजा झाल्या आहेत.बूट विक्रेत्यानी जेलरोड पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांविरोधात अधिकृत माहितीदिली आहे.
अन्यथा देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर आंदोलन करू-
रस्त्यावर थांबून व्यवसाय करणाऱ्या छोट्यामोठ्या व्यवसायिकांना अशा प्रकारे अमानुष मारहाण केली जाते.यावर पोलीस आयुक्त,पोलीस महासंचालक यांनी तात्काळ कारवाई करावी अन्यथा आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील राहत्या घरासमोर आंदोलन करू असा इशारा प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
0 Comments