सध्या एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटातील नेते एकमेकांवर टीकेची झोड उठवीत असतात. युवासेना प्रमुख आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यानी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार हे घटनाबाह्य आणि खोके सरकार असल्याची टीका केली. आदित्य ठाकरेंच्या या टीकेवरून माजी मंत्री आणि शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी त्यांना खडेबोल सुनावले आहे.
आदित्य ठाकरेंनी फक्त 40 आमदारांना बदनाम करण्याचे काम करतायत. एककलमी कार्यक्रम हाती घेतलं. आदित्य ठाकरे यांच्यावर शेंबडं मूल देखील विश्वास ठेवणार नाही, अशी टीका कदम यांनी केली आहे. गजानन किर्तीकर शिवेसनेचे ज्येष्ठ नेते आहेत. मराठी तरुणांना नोकरी देण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे.
दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी ते आले होते. तेव्हा आमच्यात चर्चा झाली. नुकताच गोरेगाव येथे उद्धव साहेबांनी गटप्रमुखांचा मेळावा घेतला. तेव्हा किर्तीकर यांनी भाषण केलं. त्या भाषणात किर्तीकर यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली होती. भाजपसोबत गेलं पाहिजे, असे जाहीर भाषण त्यांनी केले होते. याबाबत कदम यांनी भाष्य केले.
किर्तीकर माझ्याकडे आले तेव्हा देखील त्यांनी खंत व्यक्त केली की, उद्धव साहेबांजवळ सुभाष देसाई, अनिल परब यासांरखे बडवे आहेत. उद्धवजींवरची नाराजी त्यांनी माझ्याकडे स्पष्ट केली आहे. त्यांनी राष्ट्रवादीसोबत जायला नको,असे ते मला म्हणाले होते, असे कदम म्हणाले.
0 Comments