परांडा |
वाकडी गावावर शोककळा कुस्तीच्या मैदानावरून परतताना पैलवानांचा अपघात. वाकडी गावचे पैलवान कामठी तालुका मोहोळ येथील कुस्ती मैदानावरून गावाकडे परत येत असताना सोलापूर पुणे हायवे वर भीषण अपघात. अपघातात पैलवान लखन विठ्ठल
उकिरडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून पैलवान
मयूर बानगुडे हा गंभीर जखमी आहे. कालच्या कुस्ती मैदानामध्ये लखन उकिरडे यांनी ४२ किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळवला होता.
त्याने जाता जाता गावासाठी मिडल दिले आहे. त्याने मिडल जिंकल्यानंतर याची आनंद वार्ता घरच्यांना फोन करून सांगितली आणि परतत असताना थोड्याच वेळात हा भीषण अपघात झाला. त्याचा मित्रही यामध्ये गंभीरित्या जखमी झाला असून रुग्णालयात उपचार चालू आहेत. या घटनेमुळे गावासह पंचक्रोशीत हळूहळू व्यक्त होत आहे.
0 Comments