बार्शी |
श्री उत्तरेश्वर मंदिर हे बार्शीतील बारा लिंगापैकी एक मानला जाते, या देवस्थानाला बार्शीसह सोलापूर जिल्ह्यातून भाविक भक्त मोठ्या उत्साहात हजेरी लावतात. आज कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील नरक चतुर्दशी हा सण याच दिवशी उत्तरेश्वराच्या पिंडीवर सूर्याचा किरणोत्सव सोहळा पाहूयास मिळाला.
किरणोत्सव मार्गातील अडथळ्यामुळे हा सोहळा गेले काही वर्ष पूर्ण क्षमतेने पाहता आला नव्हता, उत्तरेश्वर मंदिर आतील किरणोत्सव व दिवाळीचा आनंद काही भाविक भक्तांनी स्वतःच्या डोळ्यांनी अनुभवला. या किरणोत्सवाची छायाचित्र टिपली, रोहित वायकर यांनी त्याबद्दल त्यांचे कौतुकही होत आहे. हा किरणोत्सव सोहळा सलग तीन दिवस पाहता येतो तेही सूर्योदयाच्या वेळी अशी माहिती उत्तरेश्वर मंदिरातील पुजाऱ्यांनी दिली.
0 Comments