बार्शी |
बार्शी ते मोहोळ रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडल्यामुळे गाडी चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. परतीच्या पावसाने रस्त्याची खराब अवस्था झाली आहे.
या कडे बार्शी सार्वजनिक बांधकाम विभागाचे साफ दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे. अनेक वर्षांपासून रस्त्याची परिस्थिती बिकट आहे. याकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनांनी लवकर लक्ष्य देण्याची गरज आहे. बार्शी तालुक्यातील अनेक रस्त्याची अशीच अवस्था दिसत असल्यामुळे नागरिकांतून प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. बार्शी मोहोळ या रस्त्यावर मोठी वाहतूक असल्यामुळे रस्त्याचे काम लवकर पूर्ण करण्यात यावे. अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
कव्हे येथील पूल धोकादायक बनला असून हा पूल लहान असल्यामुळे पाऊस पडला की पुलावरून पाणी जाते. त्यामुळे वाहतूक बंद होते. या पुलावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. पुलावरून वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. प्रवाशांना पण जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. पुलाचे काम आणि बार्शी मोहोळ रोडचे काम त्वरित सुरू करण्यात यावे. अशी मागणी सामान्य नागरिकांतून होत आहे.
0 Comments