बालविवाह मुक्त भारत करण्यासाठी बार्शी तालुक्यामध्ये 'ही' संस्था राबवत आहे विशेष उपक्रम



बार्शी |

कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाऊंडेशन नवी दिल्ली याच्या वतीने भारत भर सुरू केलेले  बालविवाह मुक्त भारत अभियान अंतर्गत दिशा समाज विकास संस्था यांच्या वतीने  बार्शी तालुक्यातील 30 गावात या अभियानाची सुरुवात आज दि.16 ऑक्टो 2022 रोजी करण्यात आली 
           
बालविवाह हि समस्या वाढत आहे. बाबत सर्वानी एकत्र येऊन  लढा उभा केला पाहिजे. यासाठी विविध प्रकारे प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब वडवे यांनी व्यक्त केले. महिलांनी गावागावात मेणबत्ती पेटवून व दिपप्रज्वलन करून  हा लढा यशस्वी करण्यासाठी निर्धार केला. सर्व महिलांनी या प्रथेला हद्दपार करण्याची शपथ घेतली. यावेळी महिलांनी प्रेरणा गीते सादर केली .हा कार्यक्रम यशस्वी करणे साठी संस्थे च्या कार्यकर्त्या अंजली चव्हान, राही ताटे, मनिषा शिंदे, कल्पना वाघमोडे,अमृता खोडवे यांनी गावागावात कार्यक्रम घेण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

Post a Comment

0 Comments