मुंबई |
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर रुग्णालयात तीन दिवस उपचार केले जाणार आहेत. डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेण्याचा सल्ला दिला आहे.
'शरद पवार यांची प्रकृती ठिक नसल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना ब्रिच कँडी रुग्णालयात पुढील तीन दिवस उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे, त्यांना 2 नोव्हेंबर रोजी डिस्चार्ज मिळेल आणि 3 नोव्हेंबर रोजी शिर्डी येथे पक्षाच्या होणाऱ्या पक्षाच्या शिबिरास उपस्थित राहून मार्गददर्शन करणार आहेत,' असे राष्ट्रवादीकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे.
0 Comments