बार्शी |
बार्शी सुपुत्र पोलीस उपाधीक्षक अनिल प्रल्हाद पात्रुडकर यांना १३ ऑक्टोबर २०२२ रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते गुणवत्ता पूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदकाने त्यांना सन्मानित करण्यात आले.
बार्शी शहरातील महाद्वार चौकजवळ त्याचे कुटुंबिय रहातात. सध्या गुन्हे अन्वेषण शाखा पुणे येथे ते कार्यरत आहेत. विविध शासकीय सेवेत त्यांनी आजपर्यंत ३१ वर्षे सेवा केली आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण सुलाखे हायस्कूल येथे, अकरावी-बारावी महाराष्ट्र विद्यालय तर त्यांनी श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालयातून सायन्स शाखेतून पदवी त्यांनी मिळवलेली आहे. बार्शी पुत्राला गुणवत्ता पूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक मिळवल्यामुळे बार्शी तसेच सोलापूर जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदन होत आहे.
अनिल पात्रुडकर यांनी अत्यंत खडतर परिस्थितीत कोणताही क्लास न लावता आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर १९९१ साली विविध प्रकारच्या १३ शासकीय नोकरीच्या परीक्षा उत्तीर्ण झाले. सरकारी नोकरी लागण्याआधी त्यांनी खाजगी नोकरीसाठी ही प्रयत्न केला, परंतु ते जास्त काळ खाजगी नोकरी मध्ये रमले नाहीत. अत्यंत खडतर परिस्थितीत कष्टाने अभ्यास करून एकाच वर्षी १३ परीक्षा उत्तीर्ण होण्याचा अनोखा पराक्रम त्यावेळी त्यांनी केला. नुकतेच त्यांना महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते गुणवत्ता पूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय त्यांना ३१ वर्षाच्या सेवेमध्ये ४७४ रिवार्ड्स, सर्व वार्षिक अहवाल (ACRs) सर्वोत्कृष्ट/ उत्कृष्ट असून पोलीस महासंचालकांचे पदक २०१३ मध्ये प्राप्त झाले होते. हे पदक तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले होते. पोलीस महासंचालकांचे उत्कृष्ट दोष सिद्धी पुरस्कार २०१६ मध्ये मिळाले होते. पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांचे उत्कृष्ट तपास पुरस्कार २०१७ मध्ये मिळाले होते.
याशिवाय पोलीस उप अधीक्षक अनिल पात्रुडकर हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून सेवा ही वाजवत असताना पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये चंदन नगर पोलीस ठाणे व मुंढवा पोलीस ठाणे येथे प्रभारी पोलीस ठाणे अधिकारी म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली होती. मुंढवा पोलीस ठाणे ला आयएसओ /स्मार्ट पोलीस ठाणे मानांकन त्यांच्या कालावधीत मिळाले होते.
पोलीस उप अधीक्षक अनिल पात्रुडकर म्हणाले की, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना कोणताही शॉर्टकट नाही. कठीण परिश्रमाला पर्याय नाही. विद्यार्थ्यांनी रोजच्या चालू घडामोडीवर बारकाईने लक्ष देऊन अभ्यास करावा याशिवाय इंग्रजीचे ज्ञानही घेण्याचा प्रयत्न करा. याशिवाय सरकारी नोकरीसाठी कठीण परिश्रम व फक्त कष्ट हाच पर्याय असून तेथे कोणताही वशिला किंवा इतर पर्याय चालत नाही असे प्रतिपादन हे त्यांनी केले आहे.पोलीस उप अधीक्षक अनिल प्रल्हाद पात्रुडकर यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदकने सन्मानित करण्यात आले. सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पोलीस उप अधीक्षक पात्रुडकर ते स्वतः व त्यांचे कुटुंबीय पंढरीच्या पांडुरंगाचे भक्त आहेत.
0 Comments