सोलापूर |
सोलापूर हैद्राबाद रोड वरील दहिटणे फाट्याजवळ एका चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिली आहे. दुचाकीवर असलेल्या दोघांना गंभीर दुखापत झाली होती.दुचाकीवरील एकाच उपचाररम्यान मृत्यू झाला आहे.तर एकाचा खासगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.आदर्श विठ्ठल जाधव (रा.सेटलमेंट फ्री कॉलनी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.तर जखमी अजय गायकवाड (रा.रा.सेटलमेंट फ्री कॉलनी) यास उपचारासाठी जखमी अवस्थेत यशोधरा हॉस्पिटल दाखल करण्यात आले आहे.
उपचार सुरु असताना आदर्श जाधव ता तरुणाचा मृत्यू झाला आहे.हैद्राबाद रोड वरून सोलापूर शहराच्या दिशेने निघालेल्या MH-२५-AW-०५२३ या चारचाकी वाहनाने MH-CV-११९४ या चारचाकी वाहनाने पाठीमागून दुचाकीला जोराची धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. याबाबत पोलीस नोंद सुरू आहे.
0 Comments