विहिरीत बुडालेल्या व्यक्तीचा तळातून काढला मृतदेह; करमाळ्यात ऐन दिवाळीत शोककळा


करमाळा |

तालुक्यातील खडकी येथे विहिरीत पडून बेपत्ता झालेल्या व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. सीताराम सावंत असे मृतदेह सापडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. विहिरीत पडल्यानंतर सावंत हे बेपत्ता झाले होते. त्यानंतर त्यांचा मृतदेह विहिरीच्या तळाला सापडला. त्यांना काढण्यासाठी प्रशासनाने प्रचंड प्रयत्न केले. विहिर पाण्याने भरली असल्यामुळे मदत कार्यात अडचणी आल्या होत्या. त्यांना काढण्यासाठी खास पैठण येथून पथक आले होते. काल (सोमवारी, ता. २४) सांयकाळी मृतदेह काढण्यात आला. त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सावंत हे सकाळी विहिरीत मोटार कडण्यासाठी गेले होते. त्यानंतर ते बुडाले. त्यांचा नागरिकांकडून शोध सुरु होता. करमाळा पोलिस व महसूल विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. पावसामुळे विहीर पूर्णपणे पाण्याने भरली आहे. त्या विहिरीत सावंत यांनी उडी घेतली होती. त्यानंतर ते वरती आलेच नाहीत. सहायक पोलिस निरीक्षक भुजबळ व नायब तहसीलदार विजयकुमार जाधव हे घटनास्थळी दाखल झाले होते. गावकरीही मदत करत होते. मात्र पाण्यामुळे त्यांना काढता आले नाही, अखेर त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments