सोलापूर |
सोलापूर मध्ये अनेक नागरी समस्या आहेत. नगरसेवकांचे कार्यकाळ संपल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. कचरा, ड्रेनीज, पाणी, लाईट, अश्या अनेक समस्यांना नागरिकांना सामोरे जावं लागत आहे. नगरसेवक जरी काम करीत नसले तरी. आम आदमी करिता आम आदमी तत्परतेने काम करीत आहे. सिद्धेश्वर पेठ येथील कल्याणी टॉवर जवळील कचरा कुंडी आणि सार्वजनिक मुतारीची स्वछता गेल्या अनेक महिन्यांपासून केलेली नव्हती.
आम आदमी पार्टी सोलापूर कडे नागरिकांच्या तक्रारी येताच प्रभाग क्रमांक 20 येथील इच्छुक उमेदवार जुबेर हिरापुरे आणि युवा नेते निलेश संगेपाग यांनी पुढाकार घेत जिल्हा कार्याध्यक्ष ऍड श्री खतीब वकील यांच्या नेतृत्वात तात्काळ हा स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावला. या मुतारी आणि कचरा कुंडीमुळे सर्वत्र घाण आणि दुर्गंधी पसरलेली होती. शेजारीच मस्जिद हें धार्मिक स्थळ आहे जवळच शाळा आणि मुलींचे कॉलेज आहे ज्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या मुली, महिला, आणि स्थानिक नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला होता. जुबेर हिरापुरे यांनी हा गंभीर प्रश्न तात्काळ सोडविल्याने स्थानिक नागरिकांनी जुबेर यांचा कौतुक केले.
0 Comments