बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या फळपिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ अहवाल सादर करावा असे आदेश मुख्यमंञी एकनाथ शिंदे यानी जिल्हाधिकारी सोलापूर यांना आमदार राजेंद्र राऊत यांच्या मागणीपञावर दिले आहेत.
बार्शी तालुक्यात सतत पडत असलेल्या जास्त प्रमाणाच्या पावसामुळे तालुक्यातील 5275. 21 हेक्टर शेतकऱ्यांच्या फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. या नुकसान झालेल्या फळपिकांचे त्वरित पंचनामे करावेत अशी मागणी आमदार राजेंद्र राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केलेली आहे.
नुकसान झालेले फळपिकांचे पंचनामे झाल्यानंतर त्या नुकसानीची भरपाई शेतकरी बांधवांना मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आमदार राजेंद्र राऊत यांनी सांगितले.
0 Comments