सोलापूर |
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे सोलापूर दौऱ्यावर आले होते. सर्व वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्या सोबत जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली. या प्रशासकीय बैठकी नंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली.राज्यात सत्तांतर झाल्या पासून सोलापूर
शहर आणि जिल्ह्याचा विकास खुंटलेलं आहे, असे प्रश्न विचारताच त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. मागील काहीसरकार हे महाविकास आघाडी सरकार नव्हतं तर महावसुली सरकार होते असे राधा कृष्ण विखे पाटील म्हणाले.
संजय राऊत यांचा नाव न घेता टीका- राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. त्यावर महसूलमंत्री राधा कृष्णविखे पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सडकून टीका केली.
मागच्या सरकार मध्ये भ्रष्टाचारामध्ये अनेक नेते मंत्री तुरुंगात
गेले.संजय राऊत यांचे नाव घेता, कोंबडा असे संबोधले आहे. मागच्या सरकार मधील मंत्री रोज एक माहिती समोर येत होती, हे मंत्री जेल मध्ये, एका मंत्र्याचा संबंध अतिरेक्यांशी तोही जेल मध्ये, आणि रोज उठून सकाळी एक कोंबड्या सारख बांग द्यायचा, आता मात्र राज्याचा कामकाज सुव्यवस्थित सुरू आहे, असे राधाकृष्ण विखेपाटील म्हणाले.
0 Comments