सोलापूर |
सोलापूर जिल्हा परिषदेतील प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी किरण लोहार त्यांना लाच घेताना लाचलुचपत विभागाने आज रंगेहाथ पकडले. त्यामुळे शिक्षण विभाग आणि जिल्हा परिषदेत खळबळ माजली आहे. ग्लोबल पुरस्कार विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले गुरूजी यांच्यावर आरोप केल्याने लोहार आणखी चर्चेत आले होते.दक्षिण सोलापूर तालुक्यातील एका संस्थेकडे शासकीय काम करण्यासाठी जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी पैशांची मागणी केली. पाचवी ते आठवीचे वर्ग वाढण्यासाठी शाळेने वर्गवाढीच्या परवानगीची मागणी प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहारा यांच्याकडे केली होती.
त्याचा आयडी देण्यासाठी ५० हजारांची लाच मागितली. सुट्ट्यांमुळे पैसे द्यायला थोडा उशीर झाला होता. तक्रारदार व्यक्ती आणि शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यात तडजोडी झाली. त्यानंतर लोहार यांनी पंचवीस हजार रुपये स्वीकारल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. लोहारबरोबर आणखी एकाला ताब्यात घेतल्याची माहिती आहे. तक्रारदार व्यक्तीकडून २६ हजार रुपयांची लाच स्वीकारताना शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना रंगेहात पकडण्यात आल्याचे प्राथमिक माहिती आहे.
0 Comments