ती फक्त बसेसमधून सोने चोरी करत होती;पोलिसांनी तिच्या मुसक्या आवळल्या



सोलापूर |

सोलापूर बस स्थानकात महिला प्रवाशांच्या सोन्याच्या चोरी वाढली होती.फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे डीबी पथक महिला प्रवाशांना लुटणार्या महिलेचा तपास करत होते.21 ऑक्टोबर रोजी अश्विनी गोपाळ पाटील(वय 34 वर्ष,रा,गणेश नगर हैद्राबाद रोड सोलापूर)या दिवाळी निमित्ताने माहेरी जात होत्या.एसटी स्टॅण्ड वर बस मध्ये चढताना अज्ञात महिलाने सोन्याचे दागिने लंपास केले होते.याबाबत अश्विनी पाटील यांनी 21 ऑक्टोबर रोजी फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली होती.गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि एका संशयीत महिलेस ताब्यात घेतले.आयेशा युसूफ शेख(वय 33 वर्ष,रा समाधान नगर,अक्कलकोट रोड सोलापूर) यास ताब्यात घेतल्या नंतर गुन्हा कबुल केला.फक्त एसटी बसेस मध्ये गर्दीचा फायदा घेत चोरी करत असल्याची  माहिती त्याने पोलिसांना दिली.पोलिसांनी तिच्या कडून एकूण साडेबारा तोळे वजनाचे 5 लाख 29 हजार 670 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.सध्या ती न्यायालयीन कोठडीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

गरीबीमुळे तिने चोरीचा धंदा सुरू केला-
आयेशा शेख ही अत्यंत गरीब परिस्थितीत हलाखीचर जीवन जगत आहे.सहा अपत्य असल्याने त्यांना जगवायच कसा प्रश्न तिच्या समोर पडला होता.तिने अखेर चोरीचा धंदा सुरू केला.बुरख्या मध्ये बस मध्ये चढण्यासारख नाटक करत होती.गर्दीचा फायदा उचलून महिला प्रवाशांच्या पर्सवर डल्ला मारत होती.रिकोर्ड नसल्याने  आयेशाचा तपास करताना पोलिसांच्या नाकी नऊ आले होते.


खबऱ्यामार्फत पोलिसांनीतिचा शोध लावला-
फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे डीबी पथकातील एपीआय शंकर धायगुडे यांनी खबऱ्यांची फौज लावली आणि आयेशा शेखचा शोध लावला. चोरीचे सोने विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती खबऱ्यांनी दिली आणि पोलिसांनी अलगद तिला ताब्यात घेतले.तिला अधिक विश्वासात घेऊन माहिती घेतली असता तिने अनेकदा बस मध्ये गर्दीचा फायदा घेत चोरी केल्याची माहिती दिली.कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी तिने हा धंदा करत असल्याची माहिती दिली.कोर्टात हजर केले असता कोर्टाने तिला पोलीस कोठडी सुनावली होती.पोलिसांना तपासात चार महिन्या पुर्वीची चोरी उघड झाली.


यडीबी पथकातील या टीमने कारवाई करत आयेशाचा शोध लावला-
फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने आयेशा शेख हीचा शोध लावला.हा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील, एपीआय शंकर धायगुडे,पोलीस निरीक्षक  विकास देशमुख,पोलीस नाईक दीपक डोके,आयाज बागलकोठे,धांनजय बाबर,रामा बाचावार,कृष्णा बडूरे,विनोद व्हटकर,नितीन मोरे,सचिनकुमार लवटे,अमोल खरटमल,अर्जुन गायकवाड,अजय चव्हाण,संतोष चांनकोटी,आदींनी केली.


Post a Comment

0 Comments