कोजागरी पौर्णिमेला जाण्यासाठी भाविकांची मांदियाळी; सोलापूर तुळजापूर भाविकांची गर्दी



सोलापूर |

कोरोनाच्या दोन वर्षांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर तुळजापूर यात्रा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.सोलापूर तुळजापूर महामार्गावर फक्त एकच आवाज दुमदुमत आहे."आई राधा उदो उदो"पायी जाणारे भाविक  फक्त हा आवाज देत तुळजापूर कडे जात आहे.तुळजापूर यात्रेला यंदा सर्व निर्बंध शिथिल झाल्याने आंध्र प्रदेश,कर्नाटक,आणि महाराष्ट्रातील भाविक तुळजापूर कडे जात आहे.साडेतीन शक्ती पिठापैकी एक शक्ती पीठ म्हणून तुळजाभवानी मंदिराची ओळख आहे.

लाखो भाविक तुळजापूरकडे पायी रवाना-
दसरा सण उत्सव झाल्यानंतर कोजागिरी पौर्णिमेला मोठ्या उत्साहात भाविक तुळजापूर कडे जात असतात.दोन वर्षानंतर कोजागिरी पौर्णिमा सण साजरा केला जात आहे.आंध्र प्रदेश,कर्नाटक,तेलंगणा,महाराष्ट्र राज्यातील लाखो भाविक  सोलापूर ते तुळजापूर 45 किलोमीटर प्रवास पायी करत आहेत.

वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थाची मोफत सेवा-
सोलापूर शहरात ठिकठिकाणी स्वयंसेवी संस्था भाविकांची सेवा करत अल्पोउपहार देत आहेत. सोलापूर शहरातील रूपा भवानी मातेचे दर्शन घेऊन तुळजापूर लाखो भाविक पायी जात आहेत. सामाजिक संस्था स्वच्छतेचे धडे स्वच्छता अभियान राबवत आहेत.

Post a Comment

0 Comments