बीड |
हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्वाची विचारधारा सोडणारयांनी आम्हाला आमच्या दैवाताचा फोटो लावण्यावरून बोलण्याचा आधिकार नाही असा घणाघात राज्याचे आरोग्य मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांनी बीड येथील भव्य अशा मेळाव्यातून केला. आम्हाला फोटो लावू नका म्हणणाऱ्यांना छत्रपतीच्या विचारधारेशीच गद्दारी केली आहे त्यांना छत्रपतीचे नाव सुध्दा घ्यायची लायकी नाही असा पलटवार देखील या मेळाव्यात त्यांनी केला.
बीड येथे हिंदूगर्व गर्जना यात्रेच्या दरम्यान ते बीड येथे आले असता आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार ज्ञानराज चौगुले,माजी मंत्री प्रा.सुरेश नवले, जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे,सचिन मुळूक यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुंबई येथे होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या नियोजन या मेळाव्यातून करण्यात येऊन शिवसैनिकांशी संवाद साधतांना सावंत म्हणाले की, आम्हाला डिवचायला जाल तर तुम्हाला देखील सोडणार नाही, जे कायम खोक्याचाच विचार दिवसरात्र करतात त्यांना अजून काय दिसणार असे सांगून स्वतःच्या स्वार्थासाठी सर्वसामान्य शिवसैनिकांना रस्त्यावर सोडले असा आरोप त्यांनी यावेळी केला. राज्याच्या मुख्यमंत्र्यावर बोलणारयांचा समाचार घेताना सावंत यांनी आरोप करणारयांनी आपलं स्वतःचं चारित्र्य आणी बौध्दिक क्षमता पाहून बोलावे. आघाडी सरकार ही लेना बँक होती तर आमचं सरकार देणा बँक आहे. कायम ऑनलाईन असलेले पहिले मुख्यमंत्री तर सर्वसामान्यांत मिसळणारे आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. शेतकरी,कष्टकरी यांच्या करिता हे सरकार काम करत आहेत त्यामुळेच आमचं सरकार दोनंच महिन्यात लोकाभिमुख सरकार ठरलं आहे. हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा खंडित होऊ नये याकरिता हा मोठा निर्णय घेतला असल्याचे सावंत यांनी सांगतांना आमच्या अंगावर यार तर दे दणका देऊ असा गर्भित इशारा शेवटी त्यांनी दिला.
यावेळी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी आपल्या भाषणातून पहिल्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या कार्यशैलीतून सामान्य शिवसैनिकां वरच नाहीतर आमदार खासदार तसेच मंत्र्यांवर रस्त्यावर फिरण्याची वेळ आणली. आम्हाला गद्दार म्हणणारयांनी मतदारासह हिंदुत्वाशीच गद्दारी केल्याच अडिच वर्षात सगळ्यांनी पाहिले असे सांगितले.
माजीमंत्री सुरेश नवले यांनी आपल्या भाषणातून राज्यात आलेलं हे सरकार गोरगरीब जनतेसाठी काम करणारे शिंदे सरकार आहे. आघाडीचं सरकार हे वसूली सरकार होतं अशी टिका करून शिवसैनिकांना शिंदे सरकार हे आपलं सरकार आहे अशी भावना होत आहे. जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी आपल्या भाषणातून मराठवाड्यातील ऊस उत्पादक शेतकरयांसाठी मराठवाड्याचे नेते आरोग्य मंत्री प्रा.डॉ तानाजी सावंत यांनी साखर कारखाना काढावा अशी मागणी करून मराठवाड्याच्या जनतेला आपल्या ओटीत घ्यावे अशी विनंती केली. तर सचिन मुळूक यांनी जिल्ह्यातील शिवसैनिकांच्या पाठीशी आपण ताकद उभी करावी अशी मागणी केली. यामेळाव्यात अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला. मेळाव्यास मोठ्या संख्येने शिवसैनिकांची उपस्थिती होती.
0 Comments