सोलापूर|
दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी गावातील आदिवासी शासकीय आश्रम शाळेत दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनिनी गळफास घेत आत्महत्या केले असल्याची नोंद वळसंग पोलीस ठाणे येथे झाली आहे.पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी माहिती देताना सांगितले की,नातेवाईकांनी गंभीर आरोप केले आहेत,याबाबत आमचा तपास सुरू आहे,आणि इन कॅमेरा पोस्टमार्टम करण्यात आले आहे.फॉरेन्सिक प्रयोग शाळेचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.
दहावीच्या विद्यार्थीनीने गळफास घेतल्याने खळबळ-
वैष्णवी चंदू काळे(वय 16 वर्ष,रा मुळेगाव ,पारधी वस्ती ,सोलापूर)असे मयत विद्यार्थीनीने आश्रम शाळेतील वर्गातच आत्महत्या केली आहे.ही घटना 6 ऑक्टोबर रोजी सायंकाळी उघडकीस आली आहे.7 ऑक्टोबर रोजी दिवसभर सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात मृत विद्यार्थीनीच्या नातेवाईकांचा एकच गोंधळ होता. विद्यार्थीनी वैष्णवी काळे हिने वर्गातच आत्महत्या केल्याने आश्रम शाळेतील व्यवस्थापन प्रशासनाने ताबडतोब 6 ऑक्टोबर रोजी सायंकाळी वैष्णवीच्या नातेवाईकांना माहिती दिली होती.नातेवाईक घटनास्थळी येताच त्यांनी आश्रम शाळेच्या शिक्षकांवर गंभीर आरोप करत ,वळसंग पोलीस ठाणे येथे तक्रार केली आहे.पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनसाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
नातेवाईकांच्या गंभीर आरोपामुळे इन कॅमेरा पोस्टमार्टम-
वैष्णवी काळे या आत्महत्या केलेल्या विद्यार्थीनीच्या नातेवाईकांनी गंभीर आरोप करत आक्रमक भूमिका घेतली.सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेत ,चौकशीचे आदेश दिले आहेत.वळसंग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी याबाबत तहसीलदार यांना माहिती दिली.कायद्यानुसार इनकॅमेरा पोस्ट मार्टम करण्यात आले आहे.व्हिसेरा फॉरेन्सिक प्रयोगशाळेला पाठवण्यात येणार आहे.या प्रयोगशाळेच्या प्राप्त अहवालानुसार पुढील कारवाई केली जाणार आहे.
0 Comments