आई व बहिणीला देवदर्शनासाठी घेऊन जाणाऱ्या सतरा वर्षीय तरुणाचा एसटीच्या धडकेत मृत्यू


सोलापूर |

 दुचाकीवरून आई व बहिणीला घेऊन देवदर्शनाला जाताना एस.टी.बसच्या धडकेत सतरा वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले आहेत. योगेश संतोष बल्लारे (वय १७, रा. लातूर) याचा मृत्यू झाला. ही घटना तामलवाडी गावाजवळ दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली.

योगेश बेल्लारे हा आपली आई सुवर्णा संतोष बेल्लारे (रा. लातूर) व बहीण वैष्णवी (वय १४, रा. लातूर) यांना दुचाकीवरून घेऊन मार्डीवरून तुळजापूरकडे देवदर्शनाला जात होता. ते तामलवाडी येथून जात असताना एसटीने त्यांना पाठीमागून धडक दिली. यात दुचाकीवरील तिघे दूर फेकले गेले. यात सुवर्णा आणि वैष्णवी यांना मार लागला, तर याला गंभीर इजा झाली. यामुळे त्याला लगेच उपचारांसाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, डॉक्टरांनी योगेशला मृत घोषित केले. दरम्यान, योगेश हा दहावीत शिकत होता. तो देवदर्शनासाठी जाताना अपघात झाल्याने नातेवाइकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments