सोलापूर |
कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सोलापूरहुन तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.दुचाकी आणि चार चाकी वाहन धारकांची संख्या मोठी आहे.हे वाहनधारक सोलापूर शहरातील विविध मार्गावरून जात आहेत.अशातच सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ट्रॅफिक पोलिसांकडून सर्वसामान्य नागरिकांची खुलेआम लूट सुरू आहे.नियमांचे दाखले देत हे ट्रॅफिक पोलीस भरचौकात भ्रष्टाचार करताना दिसून येत आहेत.काही सुजाण नागरिकांनी ट्राफिक पोलीस पैसे घेतानाचे चित्रीकरण करुं सोशल मीडियावर वायरल केले आहे.यामुळे सोलापूर वाहतूक पोलिसांच्या कामकाजावर संशय व्यक्त केला जात आहे.
कोजागरी पौर्णिमेला जाणाऱ्या वाहनधारकांची लूट-
दोन वर्षांपासून कोरोना महामारी मुळे तुळजापूर यात्रेला बंदी होती.यंदा मात्र सरकारने सर्व निर्बंध शिथिल केले आहे. कोजागरी पौर्णिमेला भाविक मोठ्या संख्येने पायी किंवा वाहनाद्वारे जात आहेत.रविवारी कोजागरी पौर्णिमेला जाणाऱ्या वाहन धारकांना अडवून विविध कागदपत्रे तपासणीचे काम हाती घेत वाहतूक पोलीस दलातील आनंद शिरसट व राजेंद्र नागटिळक यांनी दुचाकी वाहने अडविण्यास सुरुवात केली.हे काम करत असताना तुळजापूर कडे जाणाऱ्या वाहनधारक विनवण्या करत आपली सुटका करत होते.ट्राफिक ड्युटीवर असलेल्या दोघांनी पैसे घेत असल्याचे चित्रीकरण करून वाहने सोडत असल्याचे व्हिडीओ आपल्या मोबाईल कॅमेरात कैद केले आहे.
डीसीपीनी दिले चौकशीचे आदेश-
वाहतूक शाखेचे डीसीपी दीपाली धाटे यांनी व्हाट्सएपद्वारे सोशल मीडिया ग्रुप तयार केला आहे.यामध्ये वाहतूक संबंधी विविध विषयांवर चर्चा होते.सोलापूर शहरात वाहतूक पोलीस वाहनधारकांकडून पैसे घेत असल्याचे व्हिडीओ डीसीपीच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये टाकण्यात आले.याबाबत अनेकांनी व्हिडीओची सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला.डीसीपी दीपाली धाटे यांनी ताबडतोब मी स्वतः वयक्तिक चौकशी करून कारवाई करेन असे आश्वासन व्हाट्सअप वर दिले.याबाबत अधिक माहिती घेतली असता आनंद शिरसट यांची ड्युटी एसटीस्टॅण्ड समोर होती,तर राजेंद्र नागटिळक यांची ड्युटी पांजरापोळ चौक येथे वेगवेगळ्या ठिकाणी होती.पण हे महाशय एकत्र येत वसुली सुरू केली होती.
0 Comments