डोक्यात फरशी घालून ५० वर्षीय व्यक्तीचा खून; घटनास्थळी पोलीस दाखल


सोलापूर |

सोलापूर शहरातील मल्लिकार्जुन नगर जवळ असलेल्या रमन नगर येथे एका ५० वर्षीय व्यक्तीचा डोक्यात फरशी घालुन खून करण्यात आला आहे.बसवराज लक्ष्मण गवंडी (रमन नगर सोलापूर) वय अंदाजे ५० वर्ष असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

डोक्यात फरशी घालून खून करण्यात आल्या असल्याची असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.घटनास्थळी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलिस अधिकारी व कर्मचारी दाखल झाले आहे. घटनेचा अधिक तपास एमआयडीसी पोलिस करत आहे.

Post a Comment

0 Comments