विराट कोहलीची पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत नेट प्रॅक्टीस, व्हिडिओ व्हायरल...

विराट कोहलीची पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत नेट प्रॅक्टीस, व्हिडिओ व्हायरल...

टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये भारत आणि पाकिस्तान संघ २३ ऑक्टोबरला भिडणार आहे. मेलबर्नमध्ये होणाऱ्या या शानदार सामन्याची चाहते वाट पाहत आहेत. जिथे जिथे संधी मिळेल तिथे खेळाडू सरावात व्यस्त आहेत. असेच दृश्य सोमवारी ब्रिस्बेनमध्ये पाहायला मिळाले. येथे पाकिस्तानचा संघ नेट सत्रात सराव करत होता. यादरम्यान विराट कोहलीही आला आणि पाकिस्तानी खेळाडूंसोबत सराव करू लागला. विराट कोहलीने ४० मिनिटे सतत सराव केला. यादरम्यान पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानही त्याच्या शेजारी सराव करताना दिसले. याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. नेट सत्रानंतर कोहली थेट टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याकडे गेला.

दोघांमध्ये बराच वेळ संवाद झाला. सोमवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध च्या सामन्यात विराट कोहलीने १३ चेंडूत १८ धावा केल्या. या धावसंख्येवर त्याने ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कच्या शॉर्ट पिच चेंडूवर विकेट गमावली. याच कारणामुळे त्याने या सामन्यानंतर लगेचच नेट सेशन गाठले आणि शॉर्ट पिच बॉल्सवर बराच वेळ सराव केला.

Post a Comment

0 Comments