मोदी सरकारने पाठवलेले २००० मिळाले नसतील तर ही बातमी वाचा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या १२ व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवार, १७ ऑक्टोबर २०२२ रोजी नवी दिल्लीतील भारतीय कृषी संशोधन संस्थेत आयोजित पीएम किसान सन्मान संमेलनाचे उद्घाटन केले. याच समारंभात पीएम किसान योजनेच्या १२ व्या हप्त्यांतर्गत शेतकऱ्यांना १६,००० कोटी रुपये जारी करण्यात आले. मात्र योजनेचे लाभार्थी असूनही तुमच्या खात्यात पैसे आले नसले तर काय करायचे, यासाठी हि बातमी वाचा.

जर तुम्ही पीएम किसान योजनेत नोंदणी करताना कोणतीही माहिती, चुकीचा पत्ता किंवा बँक खात्याची माहिती भरण्यात चूक केली असल्यास हप्ता येणार नाही. तसेच राज्य सरकारकडून करेक्शन पेंडिंग असतानाही पैसे मिळत नाहीत. तुम्ही भरलेली माहिती बरोबर आहे की नाही हे तपासण्यासाठी pmkisan.gov.in या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता. तसेच, तुमचं नाव यादीत असेल आणि तुम्ही दिलेली सर्व माहिती बरोबर असूनही बँक खात्यात पैसे आले नाही, तर तुम्ही हेल्पलाइन डेस्कची मदत घेऊ शकता. टोल फ्री क्रमांक 011-24300606 आणि हेल्पलाइन क्रमांक 155261 वर कॉल करून तक्रारी नोंदवता येतील.

Post a Comment

0 Comments