बार्शी |
बार्शी शहरातील ४२२, हनुमान नगर येथे बार्शी नगर परिषदेचे मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण यांनी भेट दिली, वाल्मिकी समाजासाठी रमाई आवास व श्रम साफल्य योजनेतून घरकुले मंजूर झाली आहेत. त्या संदर्भात पाहणी करण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांनी १३ ऑक्टोबर रोजी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिली व जागेची व इतर गोष्टीची पाहणी केली. आमदार राजेंद्र राऊत यांच्या प्रयत्नामुळे वाल्मिकी समाजासाठी ५३ गुंठे जागेत ५५ घरकुले मंजूर करून आणली आहेत. यामुळे आमदार राऊत यांचेही वाल्मिकी समाजाच्या वतीने आभार मानण्यात आले.
या भेटीनंतर वाल्मिकी समाजाचे प्रश्न प्रधान्य क्रमाने सोडवण्यासाठी नगरपरिषद प्रयत्न करेल असे आश्वासन मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण यांनी दिले. यावेळी 'वाल्मीक समाज'चे अध्यक्ष अजय चव्हाण, उपाध्यक्ष आकाश चव्हाण, सचिव शक्ती चव्हाण यांनी वाल्मिकी समाजाला येणाऱ्या अडीअडचणी मुख्याधिकाऱ्यासमोर मांडल्या, त्या प्राधान्य क्रमाने सोडू असे आश्वासनही मुख्याधिकाऱ्यांनी दिले. यावेळी महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
0 Comments