म्हणून, "चंद्रकांत खैरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल"...


मुंबई |

शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात वक्तव्य करणे भोवले आहे. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. माजी खासदार चंद्रकांत खैरे हे सातत्याने शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची पाठराखण करत असतात, ठाकरे गटाचे खंदे समर्थक म्हणून ते ओळखले जातात. 

औरंगाबाद शहरातील सातारा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. शिवसेनेचे चिन्ह गोठवल्यानंतर माध्यमांशी बोलताना चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्र्याबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप करत शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी सातारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments