सोलापूर |
परीक्षा देऊन मोटरसायकलवर घराकडे निघालेल्या विद्यार्थ्यांच्या मोटरसायकलला अपघात होऊन एक जण जागीच ठार झाल्याची घटना मंद्रूप ते निम्बर्गी या रोडवर घडली. या अपघातात इतर दोन विद्यार्थी जखमी झाले आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथील लोकसेवा ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी सायन्स वर्गात शिकणारे तीन कॉलेज विद्यार्थी कॉलेजमधून परीक्षा देऊन मोटारसायकलवरुन भंडारकवठे या आपल्या मुळगावी निघाले होते.
मंद्रुप निंबर्गी रस्त्यावर काळे वस्तीजवळ ऊसाने भरुन
निघालेल्या ट्रॅक्टर आणि मोटारसायकल यात झालेल्या अपघातात आदर्श सिध्दाराम बिराजदार हा गंभीर जखमी झाला तर कृषीराज महादेव धनुरे आणि सचिन सोमनिंग चाबुकस्वार हे दोघे किरकोळ जखमी झाले. गंभीर जखमी झालेल्या आदर्शला तातडीने रुग्णालयात उपचारसाठी घेऊन गेले मात्र उपचार चालू असतानाच आदर्शचा मृत्यू झाला. भंडारकवठे गावातील एक शांत स्वभावाचा आदर्श कॉलेज विद्यार्थ्यांचे अचानक अपघाती निधन झाल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
0 Comments