बार्शी शहर परिसरात धाब्यावर दारू पिणे पडले महागात ; ऐन दिवाळीत सहा मद्यपीला 80 हजाराचा दंड



बार्शी | 

ढाब्यावर दारू पिणे पडले महागात, 6 मद्यपींना 80 हजारांचा दंड सविस्तर वृत्त असे की, 20 ऑक्टोबर गुरुवारी मिळालेल्या बातमीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी संयुक्तपणे बार्शी शहर परिसरातील हॉटेल सांज व हॉटेल राजमुद्रा येथे छापा टाकला असता दोन्ही हॉटेलचे चालक यांचेसह त्यांच्या हॉटेलमध्ये अवैधरित्या दारु पिण्याकरिता बसलेल्या 6 मद्यपींना अटक करुन त्यांचेविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्याच्या कलम 68 व कलम 84 अंतर्गत गुन्हा नोंदवून त्यांना ताब्यात घेतले होते. अटक आरोपींच्या ताब्यातून रू. 2280/- किंमतीच्या विदेशी दारुच्या बाटल्या व काचेचे ग्लास इ. मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तपास अधिकारी यांनी 21 ऑक्टोबर रोजी एका दिवसात गुन्ह्याचे आरोपपत्र न्यायालयात दाखल करुन सर्व आरोपींना मा. न्यायालय बार्शी यांचे समक्ष हजर केले असता मा. न्यायालयाने तात्काळ निकाल देत 2 हॉटेल चालकांना प्रत्येकी रू. 25,000/- व 6 मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी रू. 5000/- प्रमाणे असा एकूण 80,000/- दंड ठोठावला आहे.

करण्यात आला असून तपास अधिकारी यांनी 21 ऑक्टोबर रोजी एका दिवसात गुन्ह्याचे आरोपपत्र मा. न्यायालयात दाखल करुन सर्व आरोपींना मा. न्यायालय बार्शी यांचे समक्ष हजर केले असता मा. न्यायालयाने तात्काळ निकाल देत 2 हॉटेल चालकांना प्रत्येकी रू. 25,000/- व 6 मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी रू. 5000/- प्रमाणे असा एकूण 80,000/- दंड ठोठावला आहे. सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, संचालक सुनिल चव्हाण, विभागीय उपायुक्त पुणे अनिल चासकर यांचे आदेशान्वये व अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सोलापूर नितीन धार्मिक व उपअधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संभाजी फडतरे, सदानंद मस्करे, भरारी पथक निरिक्षक सुनिल कदम, दुय्यम निरीक्षक सुरेश झगडे, अंकुश आवताडे, पुष्पराज देशमुख, सहायक दुय्यम निरीक्षक गणेश होळकर, बिराजदार व जवान नंदकुमार वेळापूरे, मलंग तांबोळी, महिला जवान प्रियंका कुटे, वाहन चालक रशिद शेख, मारुती जडगे यांनी पार पाडली असून सदर गुन्ह्याची फिर्याद अनिल पांढरे व प्रकाश सावंत यांनी दिली असुन तपास दुय्यम निरिक्षक गणेश उंडे व सुरेश पाटील यांनी पूर्ण केला.

Post a Comment

0 Comments