जीवनसाथी डॉट कॉम वरून झाली फसवणूक
सोलापूर-वधू वर सूचक वेबसाईटवरून सोलापुरातील एका सॉफ्टवेअर इंजिनिअर तरूणीची 28 लाखांची फसवणूक करण्यात आली आहे.याबाबत जोडभावी पेठ पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद झाला आहे.जनार्दन बसव्वा रेड्डी,बसव्वा रेड्डी व जनार्दन याची आई (तिघे रा,दावनगिरी,कर्नाटक)असे तिघां विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.शिवगंगा मल्लिकार्जुन तोडकरी(वय 31 वर्ष,रा,पूर्व मंगळवार पेठ,कुंभार वेस,सोलापूर) या तरुणीने फिर्याद दिली आहे.याबाबत अधिक तपास पीएसआय ताकभाते करत आहेत.
15 ऑगस्ट ते 14 ऑक्टोबर दरम्यान झाली फसवणूक-
फिर्यादी तरुणी शिवगंगा तोडकरी ही सॉफ्टवेअर इंजिनिअर अविवाहित तरुणी आहे.पुण्यातील एका मोठ्या कंपनीत नोकरीला आहे.लॉकडाऊन पासून वर्क फ्रॉम होम काम असल्याने इंजिनिअर तरुणी ही सोलापुरात राहूनच नोकरी करत आहे.जीवनसाथी डॉट कॉम वर तिने आपले पप्रोफाइल नोंद केले आहे.15 ऑगस्ट रोजी जनार्दन रेड्डी याने ,जीवनसाथी या वधू वर सूचक वेबसाईटवरून विवाहासाठी रिक्वेस्ट पाठवली.जनार्दन व शिवगंगा यांनी एकमेकांच्या मोबाईलवरून एकमेकांचे प्रोफाइल पाठवले.यामधून ओळख निर्माण होत गेली व जनार्दन याने सॉफ्टवेअर इंजिनिअर तरूणीचा विश्वास संपादन करून पैशांची मागणी करू लागला.तरुणीने विश्वास ठेवत 17 ऑगस्ट पासून गुगल पे,आणि आयसीआयसीआय बँकेमार्फत असे एकूण 28 लाख रुपये वेळोवेळी पाठवले.
सुरुवातीला बहिणीच्या मेडिकल कॉलेजच्या ऍडमिशन साठी पैसे मागितले-
जनार्दन रेड्डी याने,शिवगंगा तोडकरी या सॉफ्टवेअर इंजिनिअर तरूणीला लग्नासाठी गळ घालून विश्वास संपादन केला होता.हळूहळू त्याने सहानुभूतीपूर्वक पैशांची मागणी केली.बहिणीला मेडिकल कॉलेजला प्रवेश घेतला आहे,आणि 1 कोटी 80 लाख रुपये भरणे आहे असे सांगितले.आणि थोडी रक्कम कमी पडली आहे असे सांगितले.सॉफ्टवेअर इंजिनिअर शिवगंगा याने विश्वास ठेवत गूगल पे द्वारे पैसे पाठवण्यास सुरुवात केली.वेगवेगळे कारणे समोर करत जनार्दन रेड्डी हा सोलापुरातील तरूणीला फसवत होता.आणि ज्या वेळी आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच तरुणीने पैसे परत मागण्यास सुरुवात केली .
फिर्यादी तरूणीच्या बहिणीने पितळ उघड केले-
शिवगंगा याची येऊ बहीण बंगलोर येथे राहावयास आहे.जनार्दन रेड्डी हा आपली तोतयागिरी लपवण्यासाठी बंगलोर येथे फिर्यादी तरुणीची बहीण विजयालक्ष्मी हिला भेटण्यासाठी गेला होता.पहिल्याच भेटीत विजयालक्ष्मीला।संशय आला.तिने आपल्या सोलापुरातील बहिणीला सावध केले,हा पैसेवाला वाटत नाही असे ही तिने माहिती दिली होती.त्यांनतर याची अधिक माहिती घेतली असता तो विवाहित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.शिवगंगा तोडकरी याला ही माहिती मिळताच जबर धक्का बसला.त्याने पैशांसाठी मोठा तगादा लावला आणि आपली फसवणूक झाल्याची जाणीव त्याला झाली.
जनार्दन हा सॉफ्टवेअर इंजिनिअर तरूणीस जीवे मारण्याची धमकी देऊ लागला-
जनार्दन रेड्डीला आपले पितळ उघड झाल्याचे लक्षात येताच त्याने शिवगंगा तोडकरी या सोलापुरातील तरुणीला जीवे मारण्याची धमकी देऊ लागला.शिवगंगा हिने ताबडतोब 18 सप्टेंबर रोजी रात्री 10 वाजता,जोडभावी पेठ पोलीस स्टेशन गाठले आणि रीतसर फिर्याद दिली.याबाबत पोलिसांनी तिघां विरोधात गुन्हा नोंद करून अधिक तपास सुरू केला आहे.
0 Comments