देशात जातीय तेढ पसरवणाऱ्या 10 यूट्यूब चॅनेलवर केंद्र सरकारने सोमवारी बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. या चॅनेलवर बनावट बातम्या प्रसारित केलेल्या आणि धार्मिक द्वेष पसरवणाऱ्या व्हिडीओमध्ये फेरफार केला आहे. अशी माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सोमवारी ही माहिती दिली.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सांगितले की, गुप्तचर संस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार आणि त्यांच्या सल्ल्यानुसार, 10 YouTube चॅनेलसह 45 व्हिडिओ ब्लॉक करण्यात आले आहेत. एका अधिकृत वृत्तात म्हटले आहे की, ज्या व्हिडिओंवर बंदी घालण्यात आली आहे. त्यांना व्हिडीओला एकूण 1.30 कोटी व्ह्यूज मिळाले आहेत, आणि सरकारने काही समुदयांचे धार्मिक अधिकार काढून घेतल्याचा दावा केला आहे. या व्हिडीओमध्ये समाजामध्ये तेढ आणि भिती पसरवणारा संदेश आहे. बंदी असलेल्या साहित्याचा वापर करून बनावट बातम्या आणि धार्मिंक द्वेष पसरवण्याच्या उद्देशाने प्रसारित केलेल्या व्हिडीओचा यात समावेश आहे. त्यात म्हटले आहे की माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने बंदी घातलेल्या काही व्हिडिओंचा वापर अग्निपथ योजना, भारतीय सशस्त्र सेना, भारताचे राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा, काश्मिर या विषयांवर चुकीची माहिती पसरवण्यासाठी
केली गेली आहे.
0 Comments