वाढदिवसानिमित्त मित्रानं केलेली पोस्ट चर्चेत; म्हणाला, "... SARA pyaar"


भारतीय क्रिकेटपटू  शुभमन गिल क्रिकेट व्यतिरिक्त वेगळ्याच कारणासाठी सोशल मीडियावर चर्चेत असतो. शुभमन गिलचंबनाव कधी सारा तेंडुलकर, तर कधी सारा अली खानसोबत जोडलं गेलं आहे. नुकतंच शुभमन गिल सारा अली खान  एकत्र एका हॉटेलमध्ये स्पॉट झाले होते. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले होते. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये दोघे एका रेस्टॉरंटमध्ये दिसले, जिथे ते एकत्र डिनर करत आहेत. मात्र आता शुभमन गिल वाढदिवसाच्या एका पोस्टमुळे चर्चेत आहे. शुभमनच्या मित्राने वाढदिवसानिमित्त अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत. या पोस्टमधील एक शब्द सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. शुभमन गिलचा जन्म 8 सप्टेंबर 1999 चा असून त्याने आज वयाची 23 वर्षे पूर्ण केली आहेत.


शुभमन गिलचा मित्र खुशप्रीत सिंह औलख याने अनोख्या पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. "माय मेन मॅन, द ओजी, त्रासदायक आणि गुगल ग्रॅज्युएट झालेल्या बाळाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..पण प्रामाणिकपणे सांगायचं तर माझे आयुष्य तुझ्याशिवाय निरर्थक आहे. देव तुला अधिक यश, कारणं, गुगलचे ज्ञान देवो. सर्वांकडून बहुत 'सारा प्यार." अशी पोस्ट खुशप्रीतनं केली आहे. या पोस्टमधील SARA या शब्दानं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. आणि त्यावरून पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.

या पोस्टमुळे पुन्हा एकदा शुभमनचे चाहते संभ्रमात पडले आहेत. नेमकी सारा कोणती? असा प्रश्न विचारत आहेत. सारा अली खान की सारा तेंडुलकर असा प्रश्न त्या पोस्टवर नेटकरी विचारत आहेत. एका युजर्सने लिहिलं आहे की, “ही पोस्ट खूप विचार करून लिहिली आहे. कारण Bohot SARA pyaar"

Post a Comment

0 Comments