बार्शी | यामुळे सुर्डी ग्रामस्थांचा शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा



बार्शी तालुक्यातील सुर्डी गावाचा सुधारणेचा आलेख चढता असताना प्राथमिक शाळेची दुरावस्था होत आहे. गावाने तालुका राज्य आणि देशपातळीवर ही सामाजिक कामातून नावलौकिक कमावलेला आहे शाळेच्या इतर भौतिक सुविधा पुरवण्यास ग्रामस्थ प्रत्येक वेळी प्रशासनासोबत उभे आहेत मात्र प्रशासनाने याच गावातील प्राथमिक शाळेचे शाळेतील शिक्षकाचे पद रिक्त ठेवून गावावर अन्याय केला आहे.


सुर्डी गावातील जिल्हा परिषद शाळेत चार वर्ग भरगच्च भरलेले, प्रत्येक वर्गावर अध्यापनात लिन झालेले शिक्षक यामुळेच आज गावात अधिकारी आणि नोकरदारांची संख्या वाढलेली दिसते मात्र मागील एक वर्षांपासून याच शाळेचा कारभार एकाच शिक्षिकेच्या डोक्यावर आहे.

शाळेतील अभ्यासक्रम आणि उपक्रम राबवता राबवता शिक्षकाच्या नाकी नऊ येत आहे. त्यात अपुऱ्या शिक्षक संख्येमुळे गुणवत्ता हा प्रश्न दत्त म्हणून उभा आहे. शाळेतील शौचालयही मोडकलीत निघाले आहेत.अपुऱ्या भौतिक सुविधा आणि प्रशासकीय अनास्थेमुळे जिल्हा परिषदांचा पट कमी होत आहे. ग्रामपंचायत,पंचायत समिती, जिल्हापरिषद यांकडे वारंवार मागणी करूनही शिक्षक मिळत नसल्याने शाळा अंतिम घटका मोजत आहे. सप्टेंबर महिना अखेर पर्यंत शिक्षक उपलब्ध करून नाही दिल्यास शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा पालक आणि ग्रामस्थांकडून देण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments