बार्शी |
बार्शी तालुका विधी सेवा समिती बार्शी वकील संघ यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या फिरते लोक अदालत साक्षरता शिबिर दिनांक २३रोजी उपलाई ठोंगे येथे बार्शी येथील जिल्हा न्यायाधीश जयेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग जे. ए. झारी यांनी कायदेविषयक मार्गदर्शन केले अध्यक्ष स्थानी बार्शी वकील संघाचे अध्यक्ष ॲड अविनाश जाधव हे होते. तर प्रास्ताविक ॲड अविनाश जाधव यांनी केले. तर ॲड लुंडे, ॲड वैद्य यांनी कायदेविषयक मार्गदर्शन केले यावेळी बार्शी तालुका सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी जायपत्रे उपस्थित होते, तर यावेळी उपळाई ग्राम पंचायतचे सदस्य व बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments