पुढचे मुख्यमंत्री तानाजी सावंत होऊ दे ! आई तुळजाभवानीकडे कार्यकर्त्यांचा साकडं



आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत हे लवकर मुख्यमंत्री होऊ दे, असे साकडे कार्यकर्त्यानी आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत आई तुळजा भवानीला घातले आहे. आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी स्मितहास्य करत कार्यकर्त्यांच्या या भावनेला मुकसंमत्ती दिली. कार्यकर्त्यांनी साकडे घातल्यानंतर देवीची महाआरती करण्यात आली. 

आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी उस्मानाबाद जिल्हयाचा धावता दौरा केला. आपला दौरा आटोपल्यानंतर ते शेवटी तुळजा भवानीच्या दर्शनासाठी आले. या वेळी कार्यकर्त्यानी उत्साहात आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत लवकरच मुख्यमंत्री होऊ दे असे साकडे घातले.

Post a Comment

0 Comments