गणेशोत्सवाचे औचित्य साधून शिवाजी नगर (उंचगाव) मध्ये जय हिंद मित्रमंडळातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी स्तुत्य उपक्रम


कोल्हापूर |

विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात आत्मविश्वासाने सामोरे जाता यावे, भविष्यात विविध टप्प्यावंर होणाऱ्या परीक्षांचे स्वरूप समजावे, त्यांच्यात  नव-चैतन्य व स्फुर्ती निर्माण व्हावी यासाठी जय हिंद मित्र मंडळ शिवाजी नगर उंचगाव यांच्या वतीने परिसरातील विद्यार्थ्यांसाठी भव्य प्रश्नमंजुषा स्पर्धा यादववाडी विद्यामंदीर या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती.
            
यामध्ये शिवाजी नगर परिसरातील विविध शाळांमधील तब्बल 200 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. मंडळाच्या सर्वच कार्यकर्त्यांनी या स्पर्धेसाठी उत्तम व काटेकोरपणे नियोजन केले होते. विद्यार्थ्यीसंख्या अपेक्षेपेक्षा जास्त झाल्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तसेच शाळेच्या सरांनी देखील पर्यवेक्षकाची भूमिका बजावली. तसेच या नियोजनामध्ये यादववाडी विद्यामंदीरातील मुख्याध्यापक व सर्व शिक्षकही सहभागी झाले तसेच शाळा व्यवस्थापन समिती मधील सदस्यांनी ही महत्वपूर्ण सहभाग दर्शविला.

विशेष म्हणजे या स्पर्धेच्या दिवशीच संध्याकाळी विद्यार्थी व पालकांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण सोहळा पडल्यामुळे विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या आनंदाला पारावार उरला नाही.  यादववाडी शाळेचे अध्यापक तसेच ताराराणी शाळेचे अध्यापक श्री सागर वातकर सर व इत्यादी मान्यवरांनी मार्गदर्शन पर केलेली व्याख्याने समाजातील अशा  कार्यक्रमाची गांभीर्यता दर्शवित होते. स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, वही, पेन व रोख रक्कम देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले. शिवाय सर्वच सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र, वही, पेन हे बक्षीस मिळाल्यामुळे सर्वच बालके खुश झाली..
                  
तसेच गणेश विसर्जना दिवशी पारंपारिक वाद्यांनी व शालेय बालकांनी केलेल्या वेगवेगळ्या वेशभूषानी गणेश मिरवणूकीचे लक्ष वेधले. दरवर्षी अशा स्पर्धेचे व कार्यक्रमांचे आयोजन व्हावे अशी अपेक्षाही पालकवर्गातून  गावकऱ्यांकडून करण्यात आली.
पालकांच्या व गावकऱ्यांच्या याच सकारात्मक  प्रतिक्रिया मंडळाच्या कार्यकर्त्यांना प्रेरणादायी तसेच र्कौतुकास्पद होत्या.

Post a Comment

0 Comments