असच मत अभिनेत्री मृणालचं देखील आहे. अभिनेत्री म्हणते, ‘माझ्या जोडीदाराने हे समजणं महत्त्वाचं आहे, की मी कोणत्या क्षेत्रातील आहे. माझे काय विचार आहेत, हे त्याला कळायलं हवं.
पुढ अभिनेत्री म्हणते, ‘आपल्या आजूबाजूला खूप असुरक्षितता आहे, म्हणून मला फक्त अशी व्यक्ती हवी आहे जी ती स्वीकारण्यासाठी पुरेशी सुरक्षित आहे. पण असा व्यक्ती भेटणं फार कठिण आहे.' असं मत अभिनेत्रीने जोडीदाराबद्दल व्यक्त केलं आहे.
आई होण्यावर काय म्हणाली अभिनेत्री
“कधीकधी मला असं वाटतं की मला आई व्हायचं आहे.” मृणालची आईही तिला या बाबतीत खूप सपोर्ट करते. मृणालने सिंगल मदर होण्याचा निर्णय घेतला, तरी अभिनेत्रीच्या आईचा पाठिंबा असणार आहे. असं देखील अभिनेत्री म्हणाली.
तर दुसरीकडे लव्हलाईफबद्दल अभिनेत्री म्हणाली, 'मला प्रेमात पडायचं नाही तर, मला प्रेमात उठायचं आहे. या सर्व गोष्टींबद्दल अभिनेत्री 'डेटिंग दिस नाइट्स' या शोमध्ये बोलली. मृणाल लवकरचं 'सीता रमण' सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.
0 Comments