परंडा/ प्रतिनिधी:
उस्मानाबाद जिल्हा अम्युचरॲथलेटिक्स असोसिएशन व क्रांती करिअर अकॅडमी परंडा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय मैदानी घेण्यात आली, अजिंक्यपद स्पर्धा व जिल्हा संघाची राज्यस्तरीय निवड चाचणी 2022 परंडा येथील क्रांती करिअर अकॅडमी च्या मैदानावर आयोजित करण्यात आली, या स्पर्धेसाठी जिल्हाभरातून 300 पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला, या कार्यक्रमाचे उद्घाटन सोनारी येथील गुरु गादीचे महंत योगी शामनाथ महाराज यांनी केले, प्रमुख पाहुणे म्हणून परंडा पोलीस स्टेशनचे पीआय सुनील गिड्डे हजर होते, शिवसेना युवा नेते रणजीत (दादा) पाटील, राजू पॅटी (स्पर्धा निरीक्षक), असोसिएशनचे अध्यक्ष भरत जगताप, स्पर्धेचे प्रमुख सचिन पाटील, चेअरमन भाऊसाहेब खरसडे, जिल्हा सचिव योगेश थोरबोले, कर निर्धारण अधिकारी प्रदीप शिंदे, ह भ प बालाजी बोराडे, कॅप्टन बापू रुपनवर, सचिव हरिदास शिंदे, वीर चक्र प्राप्त तुकाराम चव्हाण, कार्य अध्यक्ष अशोक गाडेकर, अल्ताफ शेख ,बबन कोळी हेमंत देशमुख, प्रभाकर हाके ,आप्पासाहेब शेरकर ,अरुण कोंडे, शेख खाजा ,किशोर जाधव ,धनाजी नरसाळे ,नारायण खैरे ,डॉ.सुभाष मारकड,महेश शिंदे, रामा चोबे. पंच म्हणून कांबळे सर हितेश गोरे,ऋषिकेश काळे ,माऊली भुतेकर ,प्रशांत बोराडे ,रोहित सुरवसे ,रफिक शेख ,हनुरे मॅडम ,सुनील अंबारे यांनी काम पाहिले.
या स्पर्धा परंडा नगरीमध्ये क्रांती करिअर अकॅडमीचे संचालक -पांडुरंग कोकणे, विकास काळे, दिपक ओव्हळ यांच्या अपार कष्टातून संपन्न झाल्या.
0 Comments