महाविकास आघाडी सरकारच्या काळातील तत्कालीन मंत्री बच्चू कडू यांना न्यायालयाने १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. बच्चू कडू यांना गिरगाव न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. २०१८ मध्ये एका आंदोलनादरम्यान सरकारी कामांत अडथळा आणल्याप्रकरणी गिरगाव न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी झाल्यानंतर ते आज न्यायालयात हजर झाले होते. याप्रकरणी आज सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने बच्चू कडू यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. बच्चू कडू यांना आज न्यायालयात हजर केलं असता, त्यांनी जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने बच्चू कडू यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
0 Comments