मराठा समाजाबद्दल अक्षेपार्ह विधान करणारे पोलिस निरीक्षक किरण बकाले निलंबित


जळगाव |

मराठा समाजाबद्दल अक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप असलेले वादग्रस्त पोलिस निरीक्षक किरण बकाले यांना अखेर निलंबित करण्यात आले आहे. चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी याबाबतची माहिती दिली, पोलीस अधिकारी किरण बकाले अखेर निलंबित. खातेनिहाय चौकशी होऊन बडतर्फ होईपर्यंत लढा सुरूच राहणार.!!! अशी माहिती त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून दिली.

माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही या प्रकरणात ट्विट करुन किरण बकाले यांना निलंबित करावे अशी मागणी केली होती. "मराठा समाजावर अत्यंत हीन भाष्य करणारा पीआय किरण बकाले ला तात्काळ निलंबित करावे. एखाद्या पोलीसाने कोणत्याही समाजाबद्दल आकसभाव ठेवणे हे सामाजिक सलोखा राखण्याच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. अशी प्रवृत्ती पोलीस खात्यातून हद्दपार करावी. " असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले होते.

Post a Comment

0 Comments