लव्ह जिहादची एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. सहा महिन्यांपूर्वी मेळघाटातील धारणी येथील एका 23 वर्षीय तरुणीला अकोट येथून शेख रईस नावाच्या तरुणाने पळवून हैदराबादला नेले आणि मौलानाच्या घरी नेऊन बळजबरीने विवाह केला असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
शेख रईस या तरुणाने आपणाला पळवून हैदराबाद येथे नेले. तसेच मौलानाच्या घरी नेऊन बळजबरीने विवाह केला. शिवाय जीवे मारण्याची धमकी देत मुस्लिम धर्म परिवर्तनसाठी प्रवृत्त करत गोमांस खाण्यासाठी जबरदस्ती केली, असा आरोप पीडित तरुणीने केला आहे. शेख रईस घराबाहेर गेल्यानंतर संधी साधून या तरुणीने आपली आपबिती आईला फोन वरून सांगितली. त्यानंतर तिची सुटका झाली.
0 Comments