सोलापुरात चार दिवसांपासून महिला सरपंच गायब ; सलगरवस्ती पोलीस ठाण्यात बेपत्ता तक्रार नोंद



सोलापुर |

सोलापूर जिल्ह्यातील कवठे गावाचे महिला सरपंच अचानक बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. कवठे गावाचे सरपंच जैतूनबी उस्मान शेख हे गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता आहेत. सात सप्टेंबर पासून त्या बेपत्ता आहे याबाबत सलगरवस्ती पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आहे.

सात सप्टेंबर रोजी महिला सरपंच शेख या शेळी चरण्यासाठी शेतात गेल्या होत्या. मात्र सायंकाळी शेळी परत आल्या. सरपंच शेख परत आल्याच नाहीत. घरच्या सदस्यांनी त्यांची शोधाशोध केली मात्र त्या कुठेही आढळून आल्या नाहीत. कुटुंबातील सदस्यांनी याबाबत सलगर वस्ती पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दिली आहे

सलगर वस्ती पोलिसांकडून याबाबत शोध घेण्यात आला मात्र अद्यापही त्यांचा पत्ता कुठेही लागला नाही सरपंच गायब होण्यामागे काही राजकीय पार्श्वभूमी आहे का याचाही तपास पोलीस करत आहेत मात्र अशा प्रकारे अचानक कवठे गावचे सरपंच गायब झाल्यामुळे एकच चर्चा सुरू झाली आहे

Post a Comment

0 Comments