बार्शी |
दिशा समाज विकास संस्था व आशा मंथ फाउंडेशन यांच्या माध्यमातून महिला व बालविकास विभाग एसबीसी-3 युनिसेफ तर्फे कर्मवीर ना.मा.गडसिंग गुरुजी मित्र विद्यालय मळेगाव(ता.बार्शी) येथे बालविवाह रोखण्यासाठी विद्यार्थी व पालकांची जाणीव जागृती करण्यात आली. अध्यक्षस्थानी हेमांगी सांगडे होत्या. प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून स्वयंसेवक अंजली चव्हाण, राही ताटे, अश्विनी कोंढारे, संचालक विलास मिरगणे, प्राचार्य विकास बोराडे,सुवर्णा वाईकर, वैशाली माईनकर उपस्थित होते.अंजली चव्हाण, राही ताटे यांनी माहिती, खेळ, गप्पा, गायन, गोष्टीद्वारे मनोरंजक पद्धतीने बालविवाह निर्मूलनाबद्दल माहिती दिली.
स्वयंसेवक अश्विनी कोंढारे बोलताना म्हणाल्या की,भारतात बालविवाहाचे प्रमाण 25.4 टक्के आहे.बालविवाहाचे प्रमाण ग्रामीण भागात जादा आहे, बालविवाहामुळे मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त होते तसेच तिला अनेक शारीरिक व्याधीनाही सामोरे जावे लागते.त्यासाठी तिच्या आई वडिलांचे प्रबोधन करून बालविवाह रोखणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन कोंढारे यांनी केले.यावेळी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,पालक उपस्थित होते. सूत्र संचालन व आभार गौस शेख यांनी मानले.
0 Comments