बार्शी तालुक्यातील अतिवृष्टीच्या अनुदानापासून वगळण्यात आलेल्या आठ मंडळातील सर्व गावातील शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यातवर त्वरीत अनुदान जमा करावे अशी मागणी भैरवनाथ शेतमजूर संघटनेचे अध्यक्ष सूर्यकांत चिकणे यांनी केली आहे.
अतिवृष्टीचे अनुदान त्वरीत जमा करावे व बार्शी तालुक्यातील वगळण्यात आलेल्या आठ मंडळातील सर्व गावातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान मिळावे यासाठी गुळपोळीतील एस टी स्टॅन्डवर सूर्यकांत चिकणे यांचे नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले, एक तास रस्ता रोखून धरण्यात आला होता,यावेळी पुढे बोलताना सूर्यकांत चिकणे असे म्हणाले की शेतकऱ्यांचा अंत पाहू नका, ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना तातडीनने अडचणीतून बाहेर काढा,शेतकऱ्यांच्या खात्यातवर त्वरीत अनुदान जमा करा,या आंदोलनाची तहसीलदार,कलेक्टर यांनी त्वरीत दखल घ्यावी अन्यथा शेतकऱ्यांचा उद्रेक होईल व होणाऱ्या वाईट परिणामास तहसीलदार, कलेक्टर, मुख्यमंत्री जबाबदार असतील, अतिवृष्टीचे अनुदान मागणी साठी 18/07/2022,व 10/08/2022 रोजी जिलहाधीकारी यांचे कडे लेखी निवेदनाव्दारे मागणी करण्यात आली होती सदर निवेदनाची दखल घेतली नाही म्हणुन दि 22/09/2022 रोजी गुळपोळीतील एस टी स्टॅन्डवर रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी तहसीलदार यांचे वतिने मंडल अधिकारी शिंदे,तलाठी देशमुख यांनी निवेदन स्विकारले. यावेळी गुळपोळीसह सुर्डी, मालवंडी येथील शेतकरी नवनाथ काळे, शहाजी चिकणे,राजेंद्र पाचपुंड,गुलाब शेख,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अमोल चिकणे, ग्रामपंचायत सदस्य कृष्णा चिकणे, आण्णासाहेब चिकणे, सरपंच अमोल नरखडे, उपसरपंच बाळासाहेब चिकणे व परीसरातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
0 Comments