काकासाहेब चव्हाण कॉलेज तळमावले येथे “साक्षरता दिन” उत्साहात साजरा


तळमावले |

काकासाहेब चव्हाण कॉलेज तळमावले मधील अर्थशास्त्र व वाणिज्य विभाग आणि  कला व वाणिज्य कॉलेज उंडाळे यांच्या संयुक्त विद्यमाने  8 सप्टेंबर 2022 रोजी असलेल्या जागतिक साक्षरता दिनानिमित्त दिनांक 12 सप्टेंबर 2022 रोजी कॉलेजमध्ये साक्षरता दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. साक्षरता दिनास लाभलेले व्याख्याते प्राध्यापक बी. जी. कोरे यांनी  प्रत्येकाला लिहिता वाचता येणे गरजेचे आहे. शिक्षणातून मानवी मूल्यांचा विकास होतो, त्याचबरोबर साक्षरतेच्या माध्यमातून मानवी कर्तव्य व मानवी अधिकाराची जाणीव होते असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. अरुण गाडे यांनी साक्षरतामुळे नीती मूल्यांचा विकास होतो. 

त्याचबरोबर प्रत्येक साक्षराने निरक्षरांना साक्षर करण्याची गरज आहे असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमास अर्थशास्त्र विभागाशी सामंजस्य कराराने  जोडल्या गेलेल्या कला व वाणिज्य महाविद्यालय, उंडाळे येथील  विद्यार्थी व प्रा. अर्चना  चव्हाण कार्यक्रमास उपस्थित होत्या. अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. सुधीर सावंत यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रा.राहुल यादव यांनी  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व वाणिज्य विभागाच्या प्रमुख प्रा.उषादेवी साळुंखे यांनी कार्यक्रमाचे आभार मानले. तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. नवनाथ पुजारी यांचे विशेष सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments